BREAKING NEWS

< >

marathi veg recipes marathi language

 

marathi veg recipes marathi language

 

 

टोमाटोची झटपट भाजी

 

साहित्य :-

१)      मोठे लालभडक टोमाटो तीन-चार

२)      कांदे दोन मध्यम आकाराचे

३)      तीन-चार हिरव्या मिरच्या

४)      पाव वाटी कोथिंबीर

५)      तीन चमचे तेल

६)      तिखट एक चमचा

७)      चवीपुरतं मीठ वं साखर

८)      फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत .  मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत .  कोथिंबीर चिरून घ्यावी .

२)      फोडणी करून (इथं मोहरीऐवजी मेथी वापरल्यास खमंग लागते .) त्यात कांदा परतावा .

३)      कांदा गुलाबी झाल्यावर टोमाटोच्या फोडी , मिरच्या व कोथिंबीर घालावी .  मीठ , तिखट , साखर घालून तीन-चार मिनिटं शिजवावी . 

४)      ही भाजी ब्रेडवर पसरून खायला चांगली लागते .  मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगली आहे . 

५)      घाईच्या वेळेत ही भाजी पटकन होते .  पांढऱ्या शुभ्र भाताच्या मुदीवर ही भाजी वाढल्यास पानाची शोभा वाढवते . 

६)      हल्ली मिळतो तो कांदा-लसूण मसालाही यात टाकल्यास छान लागतो .

 

 

marathi veg recipes marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS