BREAKING NEWS

< >

veg recipes in marathi

 

 veg recipes in marathi

 

                        शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी

 

(शेवग्याचं झाड घरी असेल तरच कोवळा पाला मिळतो .  बाजारात शेवग्याची पानं भाजी म्हणून विकत मिळत नाहीत .)

साहित्य :-

१)      शेवग्याचा कोवळा पाला (साधारण एक जुडी होईल एवढा)

२)      लसणाच्या पाकळ्या चार-पाच

३)      जिरं अर्धा चमचा

४)      हिरव्या मिरच्या तीन-चार

५)      मुगाची डाळ अर्धी वाटी

६)      तेल , फोडणीचं साहित्य

७)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      मुग डाळ एक तास आधी धुवून भिजत ठेवावी व नंतर निथळून घ्यावी . 

२)      शेवग्याची पानं धुवून चिरून घ्यावी .  लसूण हिरव्या मिरच्या , जिरं वाटून  घ्यावं . फोडणी करून त्यात वरील वाटण घालावं . 

३)      ते खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व डाळ जराशी परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालावी .  मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू दयावी .

४)      शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो .  पण भाजी केल्यावर चांगली लागते .  याच्या फुलांची दही घालून कोशिंबीर करतात .  

 

Searches related to veg recipes in marathi

non veg recipes in marathi language pdf

veg sandwich recipes in marathi

veg biryani recipe in marathi

veg kolhapuri recipe in marathi

veg manchurian recipe in marathi

veg cutlet recipe in marathi

veg recipes in marathi language

recipes in marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS