BREAKING NEWS

< >

mutter paneer recipe in marathi

 

Mutter paneer recipe in marathi
मटार पनीर पाककृती मराठी मध्ये 
 

साहित्य:


२५० ग्राम पनीर
१ कप हिरवे मटार
१ मोठा कांदा चिरूलेला 

४ मध्यम टोमॅटो चिरूलेला 

गरम मसाला 
२ टिस्पून आलेलसूण पेस्ट 
४-५ काजू 
मिठ चवीप्रमाणे 
२ टेस्पून  दही
कोथिंबीर
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचुर पावडर 
१/२ टिस्पून जिरे
१ हिरवी मिरची
१/४ टिस्पून हळद
१-२ टिस्पून लाल तिखट 
३ टेस्पून तेल

कृती:

१) पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.
२) एका भांड्यात २ चमचे  तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करून  घ्या 
३). तेला मध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.  कांदा शिजला कि हळद आणि आलेलसूण पेस्ट टाका .थोडावेळ परतून बारीक चिरलेला टोमॅटो यात टाकावा  .
४) थोड्या वेळानंतर  नंतर हे मिश्रण मिक्सरवर थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.
५) पॅनमध्ये १ -२ चमचे  तेल गरम करा,  त्यात गरम मसाला मध्यम आचेवर १०-१५ सेकंद परतून घ्या . त्यात वेलची आणि जिरे घालावे. आता यामध्ये  मिक्सरवर वाटलेले मिश्रण टाका व थोडे पाणी पण टाका . 
६) धणेजिरे पूड आणि लाल तिखट मिश्रणामध्ये टाका . मध्यम आचेवर ५-७ मिनीटे उकळी काढून घ्या .
७) आता भांड्यात हिरवी मिरची आणि  हिरवे मटार घालून काही मिनीटे उकळी काढावी. 
८) सुरुवातीला फ्राई केलेले पनीरचे तुकडे घालावेत . दही घालून मिक्स करावे. 
९) सजावटी साठी कोथिंबीर नंतर त्यामध्ये टाकू शकतात .


 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS