BREAKING NEWS

< >

palak paneer recipe in marathi

 

पालक पनीर : पाक कृती मराठीमध्ये 
 
साहित्य :
५० ग्रॅम पनीर 
१ जुडी पालक - अंदाजे  २०० ग्रॅम
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
२ चिमुट गरम मसाला
१-२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१/४ टीस्पून आमचूर
१ टेबलस्पून दही
१ टेबलस्पून चीज 
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती :
१. पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .
२. गरजेनुसार पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.
३. शिजलेला पालक (उरलेल्या पाण्या सकट)  आणि  हिरव्या मिरच्या  मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
४. पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा . १ चमचा बेसन किंवा तांदळाच्या पिठात २ चमचे  पाणी घाला. आणि त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवा आणि थोड्याश्या तेलात पनीर शालो फ्राय करून ठेवा .
५. एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
६. त्यानंतर धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि १/४ चमचा हळद घालून हे मिश्रण परतून घ्या .
७. मिक्सर मध्ये वाटलेला पालक घाला. आमचूर घालून एक उकळी काढा.
८. गरज्वात्ल्यास किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळून घ्या .
९. १ टेबलस्पून किसलेले चीज घाला.
१०. ह्या ग्रेवी मध्ये सर्व्ह करायच्या ५ ते १० मिनिटे आधी पनीर घाला. खूप आधी पनीर टाकून ठेवल्यास पनीरचा लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.
palak paneer recipe in marathi

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS