BREAKING NEWS

< >

marathi language recipe

 

भेंडीचे दाणे : Unique marathi language recipe

 

साहित्य :-

१)      खूप मोठया जाड भेंडीमधले दाणे एक वाटी

२)      कडा एक , लसूण पाच-सहा पाकळ्या

३)      सुकं खोबरं पाव वाटी

४)      तेल , मीठ , लाल मिरच्या सहा

५)      खडा मसाला किंवा गरम मसाला दोन चमचे

६)      कोथिंबीर अर्धी वाटी

७)      आलं एक इंच

८)      धने एक चमचा

९)      गरम पाणी तीन भांडी .

कृती :-

१)      तव्यावर भेंडीचे दाणे भाजून घ्यावेत .  नंतर कांदा , खोबरं बारीक चिरून तव्यावर तेल टाकून भाजून घ्यावं .

२)      दाणे खडा मसाला , लाल मिरच्या भाजून घ्याव्यात .  भाजलेला मसाला व लसूण-आलं थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावं .

३)      नंतर तेलाची फोडणी करून त्यात हळद , वाटलेला मसाला घालावा .

४)      चांगला परतावा .  भेंडीचे दाणेसुध्दा परतावे .

५)      नंतर गरम पाणी टाकून मीठ , कोथिंबीर टाकावी .  दहा मिनिटं मंद आचेवर भाजी शिजवावी .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS